
पाकिस्तान क्रिकेट टीमने 4 नोव्हेबंरला न्यूझीलंड विरुद्ध डीएलएनुसार 21 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने या विजयासह सेमी फायनलमधील आपलं आव्हान कायम ठेवलंय. मात्र यानंतर आता आयसीसीने पाकिस्तान कॅप्टन बाबर आझमला मोठा झटका दिलाय.

आयसीसीने एकदिवसीय रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी या दोघांना मोठं नुकसान झालं आहे.

टीम इंडियाच्या शुबमन गिल याने बाबर आझम याला आयसीसी बॅट्समन रँकिंगमध्ये मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं आहे.

शुबमन गिल याच्या नावे 830 रेटिंग्स पॉइंट्सची नोंद आहे. तर बाबरच्या खात्यात 824 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.

तर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने शाहिन अफ्रिदी याला झटका दिलाय. सिराज अफ्रिदीला पछाडत नंबर 1 गोलंदाज ठरलाय. तर शाहिनची थेट पाचव्या क्रमांकावर घसरण झालीय.

सिराजच्या नावे वनडे बॉलिंग क्रमवारीत 709 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. सिराज याआधी 856 रेटिंग्स पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर होता.