Cricket: टीममधून स्टार खेळाडूला तडकाफडकी बाहेरचा रस्ता, टी 20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणं अवघड!

Cricket news : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 2 जून पासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या काही दिवसांपूर्वी स्टार खेळाडूला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवणयात आला आहे. आयसीसीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

Sanjay patil | Updated on: May 22, 2024 | 6:36 PM
1 / 5
पाकिस्तान क्रिकेट टीमने घेतलेल्या निर्णयाची कायम चर्चा असते. असाच काहीसा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.  इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेआधी वेगवान गोलंदाज हसन अली याला टीममधून बाहेर करण्यात आलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीमने घेतलेल्या निर्णयाची कायम चर्चा असते. असाच काहीसा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेआधी वेगवान गोलंदाज हसन अली याला टीममधून बाहेर करण्यात आलं आहे.

2 / 5

आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात नुकतीच टी 20 मालिका पार पडली. हसन अली आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत पाकिस्तान टीममध्ये होता. मात्र आता इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेतून त्याला अचानक डच्चू देण्यात आला.

3 / 5

हसन अली याला काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी मुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे हसन अली याची टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघात स्थान न मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने अजून वर्ल्ड कप टीमची घोषणा केलेली नाही. आयसीसीने अंतिम संघ जाहीर करण्यासाठी 25 मे ही अखेरची तारीख दिली आहे.

4 / 5

हसन अली याला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. हसनने आयर्लंड विरुद्ध टी 20 सीरिजमधील 1 सामन्यात 42 धावा लुटवल्या. त्या मोबदल्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही.

5 / 5

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी पाकिस्तान टीम : बाबर आझम (कॅप्टन), अबरार अहमद, आजम खान, फखर जमां, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, इरफान खान, नसीम शाह, सैयम अय्यूब, सलमान आगा, शादाब खान, शाहीन अफ्रीदी आणि उस्मान खान.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us