भिकारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडून पीएसएलची बक्षिसी रक्कम जाहीर, पण पीओकेत करणार असं काम

पाकिस्तान, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भिकेला लागलं आहे. याचे अनेक पुरावे समोर आले आहेत. तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खूप काही दाखवण्याचा केविलवाणा प्रकार करत आहे. पाकिस्तान प्रीमियर लीग स्पर्धेची तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेच्या जेतेपदाची आणि इतर बक्षिसांची रक्कम जाहीर केली आहे.

| Updated on: Dec 10, 2025 | 7:33 PM
1 / 5
पाकिस्तान सुपर लीगच्या 11व्या पर्वापूर्वी पीसीबीने काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. भिकेला लागले तर भिकेचे डोहाळे काही केल्या कमी होताना दिसत नाही. पाकिस्तानमधील दोन नव्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि पीएसएलच्या बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. (फोटो- पीटीआय)

2 / 5
पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार, पीएसएल 11 मध्ये चॅम्पियन्स संघाला, उपविजेत्या संघाला आणि स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या संघाला बक्षिसी रक्कम दिली जाईल. पीएसएल 11 च्या विजेत्या संघाला 14 कोटी रूपये दिले जातील. भारतीय चलनात 4.5 कोटी रूपये असतील. बीसीसीआय आयपीएल विजेत्या संघाला 20 कोटी रक्कम देते.  ( फोटो टीव्ही 9 हिंदीवरून)

3 / 5
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील उपविजेत्या संघाला भारतीय चलनात 2 कोटी 70 लाख रुपये, तर बेस्ट डेव्हलप करणाऱ्या संघाला 1.80 कोटी मिळतील. बीसीसीआय उपविजेत्या संघाला 12.5 कोटी रुपये देते. ( फोटो टीव्ही 9 हिंदीवरून)

4 / 5
पीसीबीने पाकिस्तान प्रीमियर लीगला जगातील टॉप टी20 लीग करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मिडिया राइट्सचं टेंडरही काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासह पीसीबी नवं ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे. ( फोटो टीव्ही 9 हिंदीवरून)

5 / 5
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आणखी एक घोषणा लक्ष वेधून घेत आहे. यात पीसीबी पीओकेच्या मुझफ्फराबाद आणि इस्लामाबादमध्ये नवे स्टेडियम उभारणार आहे. इतकंच नाही तर पीएसएल 11 स्पर्धेपूर्वी सामना असलेल्या ठिकाणी कॉन्सर्ट्स होतील. ( फोटो टीव्ही 9 हिंदीवरून)