
क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेकडे लागून आहे. या स्पर्धेचं आयोजन करण्याची ही यंदाची नववी वेळ आहे.

यंदा तब्बल 7 वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. याआधी 2017 साली अखेरीस या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. (Photo Credit : Icc X Account)

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका बी ग्रुपमध्ये होते. तर इंग्लंड, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला होता. (Photo Credit : Icc X Account)

ग्रुप एमधून इंग्लंड आणि बांगलादेश, तर बी ग्रुपमधून इंडिया आणि पाकिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारली होती. (Photo Credit : Icc X Account)

पहिल्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानने इंग्लंडला पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने बांगलादेशचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक मारली होती. (Photo Credit : Icc X Account)

चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा इंग्लंड-वेल्सकडे होता. इंडिया-पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये महाअंतिम सामना खेळवण्यात आला होता. तेव्हा पाकिस्तानने 338 धावा केल्या होत्या. (Photo Credit : Icc X Account)

टीम इंडियाने साखळी फेरीत पाकिस्तानला पराभूत केलं होतं. मात्र अंतिम सामन्यात टीम इंडिया 158 धावांवर ढेर झाली. पाकिस्तानने 180 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. (Photo Credit : Icc X Account)