शाहिद आफ्रिदी या बाबतीत T20 World Cup स्पर्धेतील सर्वात अपयशी फलंदाज, आणखी कोण कोण?

Most Ducks In Icc T20i World Cup : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात हुकेल फलंदाज कोण? स्पर्धेच्या इतिहासात कोणता फलंदाज सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालाय? जाणून घ्या.

| Updated on: Feb 04, 2026 | 4:36 PM
1 / 5
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. चाहत्यांना या स्पर्धेत 20 संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत अनेक विक्रम मोडीत निघताना पाहायला मिळतील . तसेच चाहत्यांनाच नवे विक्रमांचं साक्षीदार होण्याची संधी मिळेल. या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत अनेक फलंदाजांनी धमाका केलाय.तसेच असे काही फलंदाज आहेत जे या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाले आहेत. या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

2 / 5
पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाला आहे. आफ्रिदी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 32 पैकी 5 डावात भोपळा फोडण्यात अपयशी ठरला आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

3 / 5
श्रीलंकेचा माजी फलंदाज तिलकरत्ने दिलशान टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत शून्यावर सर्वाधिक वेळा बाद होणारा दुसरा फलंदाज आहे. दिलशान 34 डावांत 5 वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo Credit : Icc X Account)

4 / 5
या यादीत तिसऱ्या स्थानी तब्बल 10 फलंदाज आहेत, जे प्रत्येकी 4-4 वेळा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत शून्यावर बाद झाले आहेत. या फलंदाजांमध्ये श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्या आणि विंडीजचा माजी फलंदाज आंद्रे रसेल याचा समावेश आहे.  (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

5 / 5
टीम इंडियाकडून टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 3 वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम माजी वेगवान गोलंदाज  आशिष नेहरा याच्या नावावर आहे. नेहरा व्यतिरिक्त क्विंटन डी कॉक, शाकीब अल हसन, पाथुम निसांका हे फलंदाजही प्रत्येकी 3-3 वेळा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत शून्यावर बाद झाले आहेत. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)