Vaibhav Sooryavanshi : इंग्लंड विरुद्ध धावा करुन दाखव, वैभव सूर्यवंशीला कुणाकडून ओपन चँलेज?

Vaibhav Sooryavanshi Team India : टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 26 जूनपासून टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेत उभयसंघात 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्याआधी पाकिस्तानच्या माजी खेळाडूने अकलेचे तारे तोडले आहेत. जाणून घ्या हा माजी खेळाडू वैभवबाबत काय म्हणाला.

| Updated on: Jun 25, 2026 | 5:26 PM
1 / 5
वैभव सूर्यवंशी याचं आयर्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. मात्र त्याआधीच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज तन्वीर अहमद याने वैभव सूर्यवंशी 21-22 वर्षांचा असल्याचं म्हटलंय. तसेच तन्वीर अहमद याने वैभवला ओपन चँलेज दिलंय. (Photo Credit: PTI)

2 / 5
तसेच तन्वीरने वैभवला इंग्लंड दौऱ्यात धावा करुन दाखवाव्यात, असं आव्हान दिलं आहे. "भारतातील पाटा पीचवर धावा करणं सोपं आहे. मात्र इंग्लंडमध्ये जेव्हा बॉल मिडल स्टंपच्या बाहेरुन स्विंग होईल तेव्हा वैभवची पोलखोल होईल", असं तन्वीरने म्हटलं. (Photo Credit: PTI)

3 / 5
"वैभवने इंग्लंड दौऱ्यात धावा केल्या तरच त्याच्यात प्रतिभा आहे हे मी मान्य करेन. वैभव भारताच्या खेळपट्टींवर धावा करत आहे. वैभव जेव्हा परदेशात खेळेल तेव्हा दूध का दूध, पानी का पानी होईल", असं तन्वीरने म्हटलं. (Photo Credit: PTI)

4 / 5
वैभवचं अचूक वय जाणून घेण्यासाठी आवश्यक चाचणी करण्यात आल्याचं तन्वीरला सांगण्यात आलं. मात्र त्यानंतरही तन्वीरने ही बाब मान्य करण्यास नकार दिला. "वैभवची ही चाचणी भारतातच झाली आहे ना. वैभवची चाचणी बाहेर कुठे झालेली नाही", असं तन्वीरने म्हटलं. तसेच ऑस्ट्रेलियातील फॉक्स या वाहिनीनेही वैभव 15 वर्षांचा नसल्याचा संशय व्यक्त केला आहे. जो क्रिकेट खेळलाय त्याला निश्चितच वैभव 15 वर्षांचा नसल्याचा संशय येईल. हिमंत असेल तर वैभवची विदेशात चाचणी करावी", असं म्हणत तन्वीरने आव्हान दिलं. (Photo Credit: PTI)

5 / 5
तन्वीरची असूया पाहता त्याला वैभवची कामगिरी आणि यश पाहवत नसल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे आता वैभव आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Photo Credit: YT SCREENSHOT)

Follow Us