
पंजाब किंग्सचा युवा खेळाडू प्रियांश आर्या याने 8 एप्रिला चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात इतिहास घडवला. प्रियांशने चेन्नईविरुद्ध शतक झळकावलं. (Photo Credit : Ipl/Bcci)

प्रियांशने या शतकी खेळीसह अनेक रेकॉर्ड्स केले. प्रियांश या मोसमात वेगवान शतक करणारा पहिला आणि एकूण दुसरा फलंदाज ठरला. प्रियांशआधी सनरायजर्स हैदराबादच्या ईशान किशन या हंगामातील पहिलंवहिलं शतक झळकावलं होतं. (Photo Credit : Ipl/Bcci)

प्रियांशने सीएसकेविरुद्ध 103 धावांची खेळी केली. प्रियांशने या खेळीत 9 षटकार आणि 7 चौकार लगावले. प्रियांशने यासह अनेक विक्रम मोडीत काढले. प्रियांशने असं काही करुन दाखवलं जे विराट कोहली आणि ख्रिस गेलसारख्या दिग्गज फलंदाजांनाही जमलं नाही. (Photo Credit : Ipl/Bcci)

प्रियांश टी 20 क्रिकेटमधील पहिला ओपनर ठरला आहे ज्याने पहिले 5 फलंदाज सिंगल डिजीट स्कोअरवर आऊट झाल्यानंतर शतक केलं. (Photo Credit : Ipl/Bcci)

प्रियांश आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान शतक करणारा संयुक्तरित्या चौथा फलंदाज ठरला आहे. प्रियांशने 39 बॉलमध्ये ही कामगिरी केली. (Photo Credit : Ipl/Bcci)