Pro Kabaddi 2023-24 : बंगाल वॉरियर्स विजयी , तेलुगू टायटन्सचा केला असा पराभव

| Updated on: Jan 09, 2024 | 9:56 PM

प्रो कबड्डी लीग आता रंगतदार वळणावर आली आहे. प्लेऑफसाठी आता 12 संघामध्ये चुरस आहे. त्यात 22 पैकी जवळपास प्रत्येक संघ 11 सामने खेळला आहे. त्यामुळे प्रत्येक सामना आता महत्त्वाचा आहे.

1 / 6
प्रो कबड्डी लीगच्या 10 व्या हंगामातील 64 वा सामना बंगाल वॉरियर्स आणि तेलुगु टायटन्स यांच्यात मुंबईतील एनएससीएल स्टेडियमवर खेळला गेला.

2 / 6
प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या पर्वात बंगाल वॉरियर्स संघ विजयासाठी कसोशीने प्रयत्न करत होता.  अखेर या सामन्यात बंगाल वॉरियर्सने  विजय नोंदवला आणि तेलुगू टायन्सचा पराभव केला.

3 / 6
बंगालने तेलुगू टायटन्सचा 20  गुणांच्या फरकाने पराभव केला. बंगालने तेलुगू टायटन्सचा 46-26 असा पराभव केला. तेलुगू टायटन्सने नाणेफेक जिंकून कोर्टवर राहण्याचा निर्णय घेतला. बंगाल वॉरियर्सने पहिला चढाई केली त्यात यश मिळालं नाही.

4 / 6
पूर्वार्धानंतर बंगालची तेलुगूवर 17 गुणांची आघाडी होती. मात्र उत्तरार्धात तेलुगू टायटन्सने काहीसे पुनरागमन केले. बंगालच्या बाजूने वैभव गर्जेच्या खेळाने तेलुगूला पिछाडीवर टाकले.

5 / 6
या विजयासह बंगालचा संघ गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. तर पराभवासह तेलुगू टायटन्स शेवटच्या स्थानावर आहे.

6 / 6
गेल्या सामन्यात बंगालला हरियाणा स्टीलर्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. 41-35 च्या फरकाने पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.