
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत एका फलंदाजाने चंडीगड विरुद्ध धमाका केला आहे. या फलंदाजाने एकूण तिसरं द्विशतकं झळकावलं आहे. (Photo Credit : PTI)

कर्नाटकाच्या रवीचंद्रन स्मरण याने चंडीगड विरुद्ध द्विशतक झळकावलं. रवीचंद्रनने नाबाद 227 धावा केल्या. रवीचंद्रनच्या कारकीर्दीतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. (Photo Credit : PTI)

रवीचंद्रन स्मरण याने या खेळीत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. स्मरणने 2 षटकार आणि 16 चौकार लगावले. स्मरणच्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकाने 547 धावा केल्या. (Photo Credit : PTI)

स्मरण रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात सातत्याने धावा करत आहे. स्मरणने आतापर्यंत 5 डावांत 550 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. स्मरणने 147 च्या सरासरीने 595 धावा केल्या आहेत. स्मरणने या मोसमात 2 द्विशतकं लगावली आहेत. तसेच स्मरणने फर्स्ट क्लास क्रिकेट कारकीर्दीतील अवघ्या 13 सामन्यांमध्ये 3 वेळा 200 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे रवीचंद्रन या मोसमात दोन्ही वेळा द्विशतकी खेळी केल्यानंतर नाबाद राहिला. रवीचंद्रनने या वर्षात आतापर्यंत 115 च्या सरासरीने 1 हजार 35 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)