राशीद खानने टी20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला, झालं असं की…

अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खान याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला आहे. या विक्रमासह राशीदने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउथीचा विश्वविक्रम मोडला आहे. नेमकं काय केलं ते जाणून घ्या

| Updated on: Sep 02, 2025 | 5:11 PM
1 / 5
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खानने टी20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम रचला आहे. त्याने सर्वाधिक विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. युएईविरुद्धच्या सामन्यात राशीद खानने 4 षटकात 21 धावा देत तीन गडी बाद केले. (PHOTO- PTI)

2 / 5
तीन विकेटसह राशीद खानने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या टिम साउथीच्या नावावर होता. (PHOTO- PTI)

3 / 5
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउथीने 123 डावात 458.5 षटके टाकली आमइ 2753 चेंडूत 164 बळी घेतले. यासह टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता.  (PHOTO- Blackcaps Twitter)

4 / 5
राशीद खानने हा विक्रम आता आपल्या नावावर केला आहे. राशीद 2015 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळत असून राशीदने 98 टी20 सामन्यात 373.2 षटकं टाकली. यात त्याने 2240 चेंडूत 165 विकेट घेतल्या. यासह टिम साउथीचा विक्रम मोडला. (PHOTO- PTI)

5 / 5
टी20 क्रिकेटमध्ये (टी20 आंतरराष्ट्रीय आणि टी20 लीग) सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रमही राशीद खानच्या नावावर आहे. त्याने 484 टी20 डावात गोलंदाजी करत 661 विकेट घेतल्या आहे. टी20 इतिहासात 650हून अधिक विकेट घेणारा एकमेव गोलंदाज आहे.(PHOTO- Ryan Pierse/Getty Images)