
पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि विकेटकीपर राशिद लतीफ यांनी ओपनर अब्दुल्लाह शफीक याला चांगलंच सुनावलं आहे. धावा करत नाहीस तर किमान शिस्तीत बोलावं, अशा शब्दात लतीफ यांनी शफीकची कानऊघडणी केली आहे. (Photo Credit : PTI)

"अब्दुल्लाह शफीक याने स्वत:चं तोंड पाहिलंय का? तो एका पत्रकाराला प्रश्न निट विचारायला सांगतोय. त्याला 50 धावाही करणं अवघड झालंय. या खेळाडूंना बोलण्याची शिस्तच नाही", अशा शब्दात लतीफ यांनी शफीकला सुनावलं. (Photo Credit : PTI)

अब्दुल्लाह शफीक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत अपयशी ठरला. यावरुन पत्रकाराने शफीकला तु सातत्याने अपयशी का ठरतोय? याचं कारण काय? असा प्रश्न केला. यावरुन शफीकने पत्रकाराला योग्य प्रश्न विचारण्याचा सल्ला दिला. (Photo Credit : PTI)

अब्दुल्लाह शफीकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांमध्ये 26.5 च्या सरासरीने एकूण 106 धावा केल्या. त्याच्या कामगिरीवरुन त्याला प्रश्न विचारता तो पत्रकारांनाच सल्ला देतोय. (Photo Credit : PTI)

अब्दुल्लाह शफीकने आतापर्यंत पाकिस्तानचं 24 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय. अब्दुल्लाहने 37.44 च्या सरासरीने 1 हजार 610 धावा केल्या आहेत. शफीकने 5 शतकं आणि 6 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit : PTI)