IPL 2025 स्पर्धेत आरसीबीचं 4+2 चं गणित, प्लेऑफपूर्वी विराट कोहली अँड टीमची धाकधूक वाढली

IPL 2025 RCB Playoffs Scenarios: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. आठ सामन्यांपैकी 5 सामने जिंकले असून 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. आता फक्त 6 सामने शिल्लक असून तीन विजय प्लेऑफचं गणित सोडवणार आहे. पण चार सामन्यांमुळे धाकधूक वाढली आहे.

| Updated on: Apr 22, 2025 | 4:21 PM
1 / 6
इंडियन प्रीमियर लीग 18 पर्वातील साखळी फेरीचा पहिला टप्पा संपला आहे. आता सामन्यांचा दुसरा भाग सुरू झाला असून प्लेऑफसाठी चुरस निर्माण झाली आहे. दुसऱ्या हाफच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बलाढ्य पंजाब किंग्जचा पराभव केला. या विजयासह आरसीबी संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

2 / 6
तिसऱ्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी पुढील सहा सामने खूप महत्त्वाचे आहेत. कारण जर आरसीबीने हे सहापैकी तीन सामन्यात दणदणीत विजय मिळवला तर ते थेट प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी 16 गुण पुरेसे असतात.

3 / 6
आरसीबीचे सध्या एकूण 10 गुण आहेत. जर उर्वरित सहा पैकी 3 सामने जिंकले तर 16 गुण होतील. पण आरसीबीला पुढील सहा पैकी 4 सामने घरच्या मैदानावर खेळायचे आहेत. पण या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने घरच्या मैदानावर एकही सामना जिंकलेला नाही.

4 / 6
आरसीबीने घरच्या मैदानावर खेळलेले सर्व तीन सामने गमावले आहेत. पण प्रतिस्पर्ध्यांच्या घरच्या मैदानावर 5 विजय आणि 10 गुण मिळवले आहेत. आरसीबीसाठी आता 4+2  सामने खेळायचे आहेत. त्यात घरच्या मैदानावरील सामने महत्त्वाचे आहेत.

5 / 6
आरसीबीला घरच्या मैदानावर खेळणाऱ्या 4 पैकी किमान 2 सामने जिंकावे लागतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला बाहेरच्या मैदानावर उर्वरित 2 सामन्यांपैकी 1 सामना जिंकला तरी 16  गुण मिळतील. अशाप्रकारे आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचू शकते.

6 / 6
सहा सामने आरसीबीचे प्लेऑफ भवितव्य ठरवतील. राजस्थान रॉयल्स (बंगळुरूमध्ये सामना), दिल्ली कॅपिटल्स (दिल्लीमध्ये सामना), चेन्नई सुपर किंग्स (बंगळुरूमध्ये सामना), लखनौ सुपर जायंट्स (लखनऊमध्ये सामना), सनरायझर्स हैदराबाद (बंगळुरूमध्ये सामना), कोलकाता नाईट रायडर्स (बंगळुरूमध्ये सामना) असे सामने असतील. (सर्व फोटो- RCB Twitter)