आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी आरबीसीचं टेन्शन वाढलं! होमग्राउंडसाठी नव्या जागेचा शोध; कारण…

आयपीएल 2026 स्पर्धेची जोरदार तयारी सुरु आहे. फ्रेंचायझी पुन्हा एकदा जेतेपदाची आस घेऊन मैदानात उतरणार आहेत. पण गतविजेत्या आरसीबीचं नव्या पर्वापूर्वीच टेन्शन वाढलं आहे. कारण चिन्नास्वामी मैदानात खेळता येणार नाही.

| Updated on: Nov 12, 2025 | 4:29 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी फ्रेंचायझींची खेळाडूंसाठी जुळवाजुळव सुरु झाली आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं टेन्शन भलत्याच कारणामुळे  वाढलं आहे. कारण होमग्राउंड चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामने खेळणं कठीण आहे. त्यामुळे आयपीएलच्या 19व्या पर्वापूर्वी आरसीबीने नव्या मैदानाची शोधाशोध सुरु आहे.   (Photo: PTI)

2 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पुण्यातील एमसीए मैदान आता होमग्राउंड म्हणून वापरण्याची शक्यता आहे.  हे मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत येते.  त्यामुळे  आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबी पुण्यात खेळेल, जवळपास निश्चित आहे. टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, आरसीबी आयपीएल 2026 साठी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमला ​​आपले होम ग्राउंड बनवू शकते.  (Photo: PTI)

3 / 5
एमसीएचे सचिव कमलेश पिसाळ यांनी सांगितले की, "पुण्यात आरसीबी सामने आयोजित करण्याची व्यवस्था चर्चेत आहे, परंतु अद्याप ती निश्चित झालेली नाही. आम्ही त्यांना आमचे स्टेडियम देऊ केले आहे. सुरुवातीच्या चर्चा सुरू आहेत आणि काही तांत्रिक समस्या आहेत ज्या सोडवण्याची गरज आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर पुण्यात सामने आयोजित करेल." (Photo: PTI)

4 / 5
आयपीएल 2025 जेतेपदानंतर एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एक मोठा अपघात झाला होता. आरसीबी खेळाडूंना ट्रॉफीचा आनंद साजरा करताना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली. यात 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर, बीसीसीआयने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. (Photo: PTI)

5 / 5
चौकशीदरम्यान, बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममधील त्रुटी उघड झाल्या. तसेच, स्टेडियमच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले. या दुर्घटनेनंतर, बीसीसीआयने बेंगळुरूमध्ये कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केलेले नाहीत. असेही म्हटले जाते की आगामी आयपीएल सामन्यांसाठी एनओसी दिली जाईल की नाही याबद्दल शंका आहे. (Photo: PTI)