इंग्लंडविरुद्धचा दुसरा सामना भारताने जिंकला, पण टेन्शन वाढलं आरसीबीचं; का ते जाणून घ्या

भारताने इंग्लंडविरुद्धचा दुसरा टी20 सामना आपल्या खिशात घातला आहे. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. खरं तर भारताच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडे, आरसीबीच्या चाहत्यांचं मात्र टेन्शन वाढलं आहे. त्याला कारणही तसंच आहे.

| Updated on: Jan 26, 2025 | 4:27 PM
1 / 5
आयपीएल स्पर्धेत गेल्या 17 वर्षांपासून आरसीबीची झोळी रितीच आहे. मात्र यंदाच्या पर्वात फ्रेंचायझीने नव्या संघाची बांधणी केली आहे. 2024 या वर्षात चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंवर लिलावात मोठी बोली लावली. यात इंग्लंडच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे.

2 / 5
आयपीएल सुरू होण्यापूर्वी भारतीय खेळपट्ट्यांवर टी20 मालिकेत इंग्लंडचे फलंदाज अपयशी ठरत आहेत. विशेषतः आरसीबीची तगडी जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिल सॉल्ट आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी पहिल्या दोन सामन्यांमध्ये अत्यंत खराब कामगिरी केली आहे.

3 / 5
कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सलामीवीर फिल सॉल्ट याला अर्शदीप सिंगने  शून्यावर बाद केले. दुसऱ्या सामन्यातही ओपनिंगला आलेल्या सॉल्टने अर्शदीप सिंगला पहिल्या चेंडूवर चौकार मारला पण त्यानंतर विकेट गमावली.

4 / 5
लियाम लिव्हिंगस्टोनने ईडन गार्डनवर 2 चेंडूंचा सामना केला.लिव्हिंगस्टोनला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात वरुण चक्रवर्ती यशस्वी ठरला. दुसऱ्या सामन्यात 14 चेंडूंचा सामना करताना लिव्हिंगस्टोनने 13 धावा केल्या आणि अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर विकेट टाकली.

5 / 5
फिल सॉल्ट आणि लियाम लिव्हिंगस्टोन भारतीय खेळपट्टीवर क्रीज मिळवण्यासाठी धडपडत आहेत. या खराब कामगिरीमुळे आता आरसीबी संघाच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.फिल सॉल्ट आणि लियाम लिव्हिंगस्टोन पुढील तीन सामन्यांमध्येही खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे.