IPL 2025 जेतेपदाचा मानकरी हा संघ ठरेल, डेव्हिड वॉर्नरने क्वॉलिफायर 2 फेरीआधीच वर्तवलं भाकीत

आयपीएल 2025 स्पर्धेतील फक्त दोन सामने शिल्लक आहेत . या दोन सामन्यानंतर नवा विजेता समोर येईल. जेतेपदाच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ आहेत. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोघांपैकी एकाचं स्पर्धेतून पॅकअप होणार आहे. असं असताना डेव्हिड वॉर्नरने एक भाकीत वर्तवलं आहे.

| Updated on: Jun 01, 2025 | 3:04 PM
1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेचा जेतेपदाचा मानकरी 3 जूनला कळणार आहे. अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जागा पक्की केली आहे. तर अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत.

2 / 5
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यापैकी एक संघ क्वॉलिफायर 2 मध्ये विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश करेल. अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध यापैकी एकाचा सामना होईल. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यापूर्वीच माजी आयपीएल खेळाडू डेव्हिड वॉर्नरने यावेळी कप जिंकणाऱ्या संघाचे नाव जाहीर केले आहे. (Photo- IPL/BCCI)

3 / 5
सोशल मीडियावर एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना डेव्हिड वॉर्नर म्हणाला, "मला वाटते की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यावेळी ट्रॉफी उचलेल." तसेच जोश हेझलवूड अंतिम सामन्यात चमक दाखवून सामनावीराचा पुरस्कार जिंकेल, असंही भाकीत वर्तवलं आहे. (Photo- PTI)

4 / 5
मागच्या 17 वर्षात आरसीबीची तीन वेळा जेतेपदाची संधी हुकली. शेवटच्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आता 9 वर्षानंतर आरसीबी संघ पुन्हा अंतिम फेरीत पोहोचला आहे. साखळी फेरीत आरसीबीने चांगली कामगिरी केली आहे. म्हणूनच यंदाच्या आयपीएलमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी आरसीबी हा आवडता संघ म्हणून ग्राह्य धरला जात आहे. (Photo- BCCI/IPL))

5 / 5
3 जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम फेरीत उत्तम कामगिरी करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिल्यांदाच विजेतेपद मिळवेल का हे पाहणे औत्सुक्याचं आहे. 17 वर्षात जे इतरांना जमलं नाही ते रजत पाटिदारच्या नेतृत्वात शक्य होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. (Photo- BCCI/IPL))