FIFA स्पर्धेच्या 59व्या सामन्यात मोडला सर्वाधिक गोलचा विक्रम, नंबर 1 खेळाडू आणि टीमबाबत जाणून घ्या

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील राउंड 32 स्पर्धेसाठी 23 संघ ठरले आहेत. तर नऊ संघासाठी चुरस सुरू आहे. असं असताना या स्पर्धेतील सर्वाधिक गोलचा विक्रम 59व्या सामन्यापर्यंत मोडले गेले आहे. यापूर्वी कोणत्याही स्पर्धेत इतक्या कमी सामन्यात सर्वाधिक गोलचा विक्रम मोडला गेलेला नाही.

| Updated on: Jun 27, 2026 | 3:49 PM
1 / 5
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा ऐतिहासिक असणार हे सुरूवातीपासून ठरलं होतं. कारण या स्पर्धेत पहिल्यांदाच 48 संघ मैदानात उतरणार होते. स्पर्धा सुरू झाल्यापासून त्यात आणखी विक्रमांची भर पडत गेली. आता या स्पर्धेत सर्वाधिक गोलचा विक्रम रचला गेला आहे. 60 सामन्यांच्या आतच सर्वाधिक गोलचा विक्रम रचला गेला. (Photo: Getty Images)

2 / 5
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडाकडे असून या स्पर्धेत गोल मारण्याचा विक्रम रचला गेला आहे.  वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरी संपण्यापूर्वी 180हून गोल मारले गेले आहेत. एका वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वाधिक गोल आहेत. (Photo: Getty Images)

3 / 5
या स्पर्धेच्या 59व्या सामन्यात अमेरिकेचा डिफेंडर ऑस्टन ट्रस्टी याने तुर्कीविरुद्ध गोल मारला. हा वर्ल्डकप स्पर्धेतील 173वा गोल होता. या गोलसह चार वर्षापूर्वी कतारमध्ये पार पडलेल्या वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील विक्रम मोडीत काढला. त्या स्पर्धेतील 64 सामन्यात इतके गोल मारले गेले होते. (Photo: Getty Images)

4 / 5
या सर्वाच्या इतिहासात सर्वाधिग गोल अर्जेंटीनाचा दिग्गज आणि कर्णधार लियोनल मेस्सीने मारले आहेत. त्याने दोन सामन्यात 5 गोल मारले आहे. त्यानतंर फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पे, नॉर्वेच्या अर्लिंग हालँड आणि ब्राझीलच्या विनिशियस ज्यूनियरचा नंबर लागतो. यांनी प्रत्येकी 4 गोल मारले आहेत. (Photo: Getty Images)

5 / 5
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सर्वाधिक गोल मारणाऱ्या संघांच्या यादीत जर्मनी आणि नेदरलँड हे संघ आघाडीवर आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 10-10 गोल मारले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर यजमान अमेरिका आणि कॅनडा असून प्रत्येकी 8-8 गोल मारले आहेत. (Photo: Getty Images)

Follow Us