IND vs ENG : ऋषभ पंत-जसप्रीत बुमराह यांच्यात ‘लढाई’, दोन्ही बाजूंनी प्रकरण असं फसलं

पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल निर्णायक वळणावर आला आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 371 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. आता हे लक्ष्य इंग्लंड गाठणार का? की भारत ऑलआऊट करेल? असा प्रश्न आहे. पण ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्यातील स्पर्धा समोर आली आहे. चला जाणून घेऊयात प्रकरण

| Updated on: Jun 24, 2025 | 4:13 PM
1 / 5
लीड्स कसोटी सामन्यात इंग्लंडसमोर 371 धावांचं लक्ष्य आहे. पाचव्या दिवशी कसोटी सामना रंगतदार वळणावर आला असून कोण बाजी मारणार? असा प्रश्न आहे. असं असताना पहिल्या सामन्यात ऋषभ पंत की जसप्रीत बुमराह यांच्यात वेगळीच स्पर्धा रंगली आहे. हे प्रकरण काही गंभीर नाही, पण सामनावीराचा पुरस्कार कोण जिंकणार? याबाबत आहे. (PC-PTI)

2 / 5
पुरस्कारासाठी ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्यात थेट स्पर्धा आहे. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने कसोटीच्या दोन्ही डावात शतक ठोकलं आहे. पहिल्या डावात 134 आणि दुसऱ्या डावात 118 धावा केल्या. (PC-PTI)

3 / 5
जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात पाच विकेट घेतल्या आहेत. जर दुसऱ्या डावातही पाच विकेट घेण्यात यश मिळवलं तर जसप्रीत बुमराहही सामनावीराच्या शर्यतीत येईल. (PC-PTI)

4 / 5
जसप्रीत बुमराह दुसऱ्यांदा पाच विकेट घेतल्या तर त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. कारण लीड्सवरील खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. या खेळपट्टीवर भारताकडून पाच, तर इंग्लंडकडून एकाने शतकी खेळी केली आहे. (PC-PTI)

5 / 5
सामनावीराचा पुरस्कार कोणालाही मिळाल तरी जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत दोघेही विजयाची शिल्पकार ठरतील . पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेईल. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावेल. (PC-PTI)