
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु असून चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने फक्त चार चेंडू खेळले. त्यात एकही धाव आली नाही. भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता पाचव्या दिवशी काय होते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

विकेटकीपर ऋषभ पंतची खेळी या सामन्या महत्त्वाची ठरली. त्याने 105 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने 99 धावा केल्या. त्याचं शतक फक्त एका धावेने हुकलं. ऋषभ पंत सातव्यांदा नर्व्हस 90 चा शिकार झाला आहे.

ऋषभ पंत पहिल्यांदा 2018 मध्ये नर्व्हस 90 चा बळी ठरला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध 84 चेंडूत 92 धावांची खेळी करून बाद झाला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध पुन्हा तसंच काहीसं झालं दुसऱ्यांदा 92 धावांवर बाद झाला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2021 मध्ये सिडनी कसोटीत ऋषभ पंत 97 धावांवर बाद झाला. याच वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत 91 धावांवर बाद झाला होता.

2022 या वर्षीही दोन वेळा नर्व्हस 90 चा बळी ठरला होता. श्रीलंकेविरुद्ध 96 धावा, तर बांगलादेशविरुद्ध 93 धावांवर बाद झाला होता. आता न्यूझीलंडविरुद्ध 99 धावांवर बाद होत सातव्यांदा अनलकी ठरला आहे.

99 या धावसंख्येवर बाद होणारा ऋषभ पंत हा चौथा विकेटकीपर आहे. यापूर्वी महेंद्रसिंह धोनी, जॉनी बेअरस्टो आणि ब्रँडन मॅकलम हा 99 धावांवर बाद झाला होता. (सर्व फोटो- बीसीसीआय)