
भारत आणि इंग्लंड पहिला कसोटी सामना आता निर्णायक वळणावर आहे. इंग्लंडने 371 धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी बिनबाद 21 धावा केल्या. अजूनही 350 धावांचं लक्ष्य गाठायचं असून काय होईल याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष्य लागून आहे. दरम्यान, ऋषभ पंतने दुसऱ्या डावातही शतकी खेळी केली. पण फ्लिप न मारता वेगळ्याच पद्धतीने आनंद साजरा केला.

ऋषभ पंतने डोळ्यावर बोट ठेवून वेगळ्या पद्धतीने केलेल्या सेलीब्रेशनने लक्ष वेधून घेतलं. अशा पद्धतीने सेलीब्रेशन करण्याचा अर्थ काय? विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने असं सेलीब्रेशन का केलं? असे एक ना अनेक प्रश्न पडले आहेत. चला जाणून घेऊयात त्याचं उत्तर

ऋषभ पंतचं सेलीब्रेशन हे इंग्लंडचा फुटबॉलपटू डेले अली याची प्रेरणा घेऊन केल्याचं बोललं जातं आहे. एव्हर्टन आणि टोटेनहॅम हॉटस्परकडून खेळणारा डेले अली गोल केल्यानंतर अशाच पद्धतीने डोळ्यावर बोट ठेवून साजरा करायचा. ऋषभ पंतने त्याचं अनुकरण केल्याचं बोललं जात आहे.

फुटबॉलपटू डेले अलीने या सेलीब्रेशनबाबत सांगितलं होतं की, 'माझ्या संघातील मित्र जेमी वर्डीची मुलं माझ्यासोबत अशी खेळायची. मी देखील मैदानात असंच दाखवू लागलो. याचा कोणताही विशिष्ट राजकीय किंवा सामाजिक अर्थ नाही.'

फुटबॉलप्रेमी ऋषभ पंतने डेले अलीच्या सेलिब्रेशनने इंग्लंडच्या खेळाडूंचे लक्ष वेधून घेतले. त्याने त्याच्या दुसऱ्या शतकाच्या सेलीब्रेशनवेळी असं केलं. आता पुढच्या सामन्यातही असंच सेलीब्रेशन करतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. (सर्व फोटो- TV9 Hindi/Kannada)