
भारत आणि इंग्लंड सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहेत. इंग्लंडने मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. या सामन्यात भारतीय संघाला पाच शतके झळकावूनही त्यांना विजय मिळवता आला नाही. ऋषभ पंतने दोन्ही डावात शतकी खेळी करून लक्ष वेधून घेतले. (फोटो- BCCI)

लीड्स कसोटी सामन्यात टीम इंडियासाठी दोन्ही डावात शतके झळकावणाऱ्या ऋषभ पंतने संघाला आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली होती. पहिल्या डावात 134 धावा करणाऱ्या पंतने दुसऱ्या डावात 118 धावांची शतकी खेळी केली होती. (फोटो- BCCI)

पंतच्या दोन शतकांमुळे त्याला आयसीसी क्रमवारीत बढती मिळाली होती. मागच्या आठवड्याच्या क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेला पंत या आठवड्यात एका स्थानाने पुढे सरकला आहे. आता त्याची वर्णी सहाव्या स्थानावर लागली आहे.(फोटो- BCCI)

ऋषभ पंतचे सध्या 801 रेटिंग पॉइंट्स आहेत. कसोटी कारकिर्दीतील त्याचे सर्वोत्तम रेटिंग आहे. ऋषभ पंत सहाव्या स्थानावर पोहोचण्याचे आणखी एक कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतीमुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर आहे. बावुमा रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरला आहे. (फोटो- BCCI)

इंग्लंडचा जो रूटने सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. हेडिंग्ले कसोटीत 28 आणि नाबाद 53 धावा करणारा रूट 889 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. (फोटो- PTI)

इंग्लंडचा माजी कर्णधार हॅरी ब्रुक 874 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडने तीन स्थानांनी झेप घेत दहावे स्थान मिळवले आहे. (फोटो- AFP)