
टीम इंडियाने हातात असलेला लीड्स कसोटी सामना गमावला. 371 धावांचं आव्हान देऊनही सामना आपल्या पारड्यात खेचता आला नाही. पण असं असतानाही एक खेळाडूने चाहत्यांचं मन जिंकलं. ऋषभ पंतने दोन्ही डावात शतकी खेळी करून इतिहास रचला. पण त्याची शतकी खेळी टीम इंडियावर भारी पडलं असं म्हंटलं तर आश्चर्याचा धक्का बसला. (फोटो- PTI)

ऋषभ पंतने विदेशी भूमीवर जेव्हा कधी शतकी खेळी केली तेव्हा टीम इंडिया कधीही सामना जिंकू शकलेली नाही. पंतच्या नावावर विदेशात एकूण सहा शतकं आहेत. प्रत्येक वेळी टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. (फोटो- PTI)

ऋषभ पंतने 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध शतक ठोकलं आणि पराभव झाला. 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 159 धावा केल्या, पण हा सामना ड्रॉ झाला. 2022 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध नाबाद 100 केल्या पण पराभवाचं तोंड पाहावं लागलं. 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध 146 धावा केल्या आणि टीम इंडिया पराभूत झाली. (फोटो- PTI)

लीड्स कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताने 134 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 118 धावा केल्या. पण टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. इंग्लंडने भारताला 5 विकेट राखून पराभूत केलं. म्हणजेच पंतच्या शतकी खेळीनंतर टीम इंडियाला विजय मिळवता आलेला नाही. (फोटो- PTI)

ऋषभ पंत आणि शतकाचा हा निव्वल योगायोग आहे. पण विकेटकीपर फलंदाज म्हणून तो त्याची जबाबदारी चोखपणे बजावत आहे. पण इतर फलंदाज आणि गोलंदाजांची सुमार कामगिरी पराभवासाठी कारणीभूत ठरत आहेत. (फोटो- PTI)