
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप 2023 फायनल सामना होणार आहे. त्याआधी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी फोटोशूट केलं.

महाअंतिम सामन्याआधी रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स या दोन्ही कर्णधारांनी वर्ल्ड कप ट्रॉफीसबोत फोटोशूट केलं. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दोन्ही कर्णधारांनी वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत पाटन येथील रानी की वाव इथे फोटोशूट केलं. आयसीसी आणि बीसीसीआयने हे फोटो शेअर केले आहेत.

ऑस्ट्रेलिया कॅप्टन पॅट कमिन्स याचं स्थानिकांनी जोरदार स्वागत केलं. यावेळेस पॅटने चाहत्यांसोबत सेल्फी घेतला.

दरम्यान सामन्याच्या पूर्वसंध्येला शनिवारी 18 नोव्हेंबर रोजी दोन्ही संघांचे खेळाडू हे साबरमती रिवर फ्रंट क्रूझवर एकत्र डिनर करणार आहेत. तर 19 तारखेला दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.