
टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या कर्णधारपदात वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 8 सामने जिंकले. टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली. टीम इंडिया आपला साखळी फेरीतील अखेरचा सामना 12 नोव्हेंबर रोजी नेदरलँड्स विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात रोहितला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

रोहितने आतापर्यंत वर्ल्ड कपमधील 8 सामन्यात धमाकेदार कामगिरी केली आहे. रोहितने 8 सामन्यात 1 शतकासह 442 धावा केल्या आहेत.

रोहितला वनडे वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक सिक्सचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. रोहित त्या वर्ल्ड रेकॉर्डपासून 5 सिक्स दूर आहे. सध्या हा विक्रम विंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने 49 सिक्स ठोकले आहेत. तर रोहितच्या नावावर 45 सिक्स आहेत.

रोहित शर्माला नेदरलँड्स विरुद्ध 5 सिक्स ठोकून वर्ल्ड रेकॉर्डची संधी आहे. रोहितचा सध्याचा फॉर्म पाहता त्याच्यासाठी 5 सिक्स मोठी बाब नाही.

टीम इंडियाला नेदरलँड्स विरुद्ध सामना जिंकून वर्ल्ड कपमध्ये सलग 9 सामने जिंकण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना रेकॉर्ड्च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा आहे.