रोहित शर्मा निवृत्ती घेणार हे झालं पक्कं? चाहत्यांसाठी आनंदाची बातमी पण धाकधूक वाढली!
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आता फक्त वनडे सामने खेळत आहे. कारण त्याने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण गेल्या काही दिवसात त्याच्या वनडे निवृत्तीच्या बातम्यांचं पेव फुटलं आहे. असं असताना एका बातमीने चाहत्यांना आनंद झाला आहे, पण धाकधूकही वाढली आहे.

भारतीय संघाने नुकताच इंग्लंड दौरा केला आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. पहिल्या दोन वनडे सामन्यात फेल गेलेला रोहित शर्माने तिसऱ्या वनडे सामन्यात जबरदस्त खेळी केली. त्याच्या शतकी खेळीमुळे निवृत्तीच्या बातम्यांसह टीकाकारांची तोंडही बंद झाली. (Photo: PTI)

इंग्लंड वनडे मालिकेतील शेवटचा सामना लॉर्ड्सवर पार पडला आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल असं बोललं गेलं. पण त्यानंतर बीसीसीआयला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. रोहित शर्मा निवृत्ती घेणार नाही असं बीसीसीआयकडून स्पष्ट केलं गेलं. (Photo: PTI)

रोहित शर्माच्या निवृत्तीचा धुराळा शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा पेव फुटलं आहे. यावेळी काही तर भलत्याच कारणामुळे संदर्भ जोडला जात आहे. खरं तर हे कारण रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाचं आहे. रोहित शर्मा एका रिएलिटी शोमध्ये अँकरची भूमिका बजावणार आहे. या कार्यक्रमाचं नाव हिटमॅन आहे. (Photo: PTI)

रोहित शर्माचा हा कार्यक्रम सप्टेंबर महिन्यात लाँच होणार आहे. तसेच भारताची पुढची वनडे मालिका सप्टेंबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. रोहित शर्मा रिएलिटी कार्यक्रमात व्यस्त असेल तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. (Photo: PTI)

रोहित शर्माबाबतचा हा तर्कही खोटा ठरावा, असं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. कारण रोहित शर्माची पुढच्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्याने फिटनेस सुधारलं आहे. तसेच मेहनत घेत आहे. आता निवडकर्ते त्याच्या नावाचा विचार करत आहेत की नाही हा देखील प्रश्न आहे. (Photo: PTI)