
रोहित शर्मा पुन्हा एकदा आयपीएलच्या नवीन पर्वासाठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात कर्णधारपद मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. पहिला सामना वगळता इतर सामन्यात कर्णधार नसेल. (Photo- PTI)

आयपीएल 18 व्या पर्वात जेव्हा रोहित शर्मा पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. तेव्हा त्याच्या नावावर एका विक्रमाची नोंद झालेली असेल. आयपीएल स्पर्धेत त्याने मैलाचा दगड गाठलेला असेल.फक्त एमएस धोनी त्याच्या पुढे असेल.तर दिनेश कार्तिकला मागे टाकलेलं असेल. (Photo- IPL)

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याचा मान एम एस धोनीला मिळाला आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 264 सामने खेळले आहेत. या काळात त्याने 5243 धावा केल्या आहेत. यात या पर्वात आणखी भर पडणार आहे.(Photo- PTI)

दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर सध्या तरी आहे. दिनेश कार्तिकने आतापर्यंत आयपीएलमध्ये 257 सामने खेळले आहेत. दिनेश कार्तिकने 4842 धावा केल्या आहेत. रोहित शर्मानेही त्याच्याइतकेच सामने खेळले आहेत. पण आता पुढे निघण्याची संधी आहे. (Photo- PTI)

रोहित शर्माने आयपीएलमध्ये 257 सामन्यांमध्ये एकूण 6628 धावा केल्या आहेत. या पर्वात पहिला सामना खेळताच तो दिनेश कार्तिकला मागे टाकेल. त्यानंतर फक्त एमएस धोनी त्याच्या पुढे राहील. दिनेश कार्तिकने आता आयपीएलमधूनही निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे विक्रमाच्या आसपास कोणी नाही. विराट कोहली 252 सामने खेळा आहे. (Photo- PTI)