
वुमन्स प्रीमियर लीग (WPL 2025) तिसरं पर्व सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला धक्का बसला आहे. आरसीबीची स्टार खेळाडू सोफी डिव्हाईनने आगामी वुमन्स प्रीमियर लीगमध्ये खेळणार नसल्याचे सांगितले आहे.

न्यूझीलंडची कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू सोफी डिव्हाईनने काही काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सोफीने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला सांगितले की, तब्येतीला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे काही काळ कोणतीही मालिका किंवा स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

सोफी डिव्हाईनच्या तात्पुरती विश्रांती घेण्याच्या निर्णयाला न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता पुढचे काही दिवस कोणतीच स्पर्धा खेळणार नाही. त्यामुळे आरसीबीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

मागच्या दोन पर्वात सोफी डेव्हाईन आरसीबीसाठी सलामीला उतरत होती. तिने 18 डावात 2 अर्धशतकांसह एकूण 402 धावा केल्या आहेत. गोलंदाजीतही तिने 9 विकेट्स घेतल्या आहेत. आता सोफी डिव्हाईन बाहेर पडल्यामुळे आरसीबीला तिच्याऐवजी अष्टपैलू खेळाडू निवडावा लागणार आहे.

आरसीबी महिला संघ : स्मृती मंधाना, एलिस पेरी, ऋचा घोष, रेणुका सिंग, जॉर्जिया वेरेहम, केट क्रॉस, सबिनेनी मेघना, रंका पाटील, आशा शोभना, एकता बिश्त, कनिका आहुजा, डॅनिएल वॅट, प्रेमा रावत, जोशिता व्हीजे, राघवी बी. पवार, चार्ली डीन.