CSK Captaincy | चेन्नईचा पुढचा कॅप्टन कोण? धोनीच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं नाव

Chennai Super Kings Future Captain | महेंद्रसिंह धोनी याच्यानंतर चेन्नई सुपर किंग्स टीमचा कॅप्टन कोण होणार? अखेर उत्तर समोर आ

| Updated on: Jul 24, 2023 | 6:18 PM
1 / 5
महेंद्रसिंह धोनी याच्यानंतर चेन्नई सुपर किंग्स टीमची कॅप्टन्सी कोण सांभाळणार? असा प्रश्न असंख्य क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. आयपीएल 17 व्या मोसमात चेन्नईचा कॅप्टन बदलणार का? या प्रश्नांची उत्तरं कुणालाच माहिती नाही. मात्र चेन्नईचा भावी कर्णधार कोण असेल, याबाबत अंबाती रायुडू  याने विधान केलं आहे. (PC-BCCI/IPL)

2 / 5
चेन्नईचा भावी कॅप्टन कोण असणार याबाबत आधीच ठरलंय, असं रायुडूने म्हटलंय. रायूडुनुसार, टीम मॅनेजमेंटने ऋतुराज गायकवाड याच्यात कॅप्टन्सीसाठी आवश्यक असलेले सर्व नेतृत्व गुण पाहिले आहेत. (PC-BCCI/IPL)

3 / 5
रायुडूनुसार,  येत्या काळात गायकवाडला कॅप्टन होण्याची सुवर्णसंधी आहे. ऋतुराज येत्या 10 वर्षांपर्यंत चेन्नईचं कर्णधारपद सांभाळू शकतो, असं रायुडूने म्हटलं. (PC-BCCI/IPL)

4 / 5
चेन्नई 16 व्या मोसमात आयपीएल चॅम्पियन ठरली. ऋतुराजने चेन्नईच्या या विजयात निर्णायक भूमिका बजावली. ऋतुराजने या हंगामात  590 धावा केल्या. (PC-BCCI/IPL)

5 / 5
ऋतुराजचा योग्य पद्धतीने वापर केला जात नाहीये, असं रायूड टीम इंडियाला उद्देशून म्हणाला. रायूडुनुसार, ऋतुराज गायकवाड याला टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळायला हवं, पण तंस होत नाहीये. (PC-BCCI/IPL)