Gold Price Today : सराफा बाजारात मोठी घडामोड, ऑगस्टच्या पहिल्या दिवशी सोन्याचे भाव वाढले की कमी ? 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती ?
Gold Price Today 1 August 2026 Latest News Updates in Marathi: येत्या काळात सोन्याच्या किमतींवर जागतिक बाजारातील घडामोडी, चलन बाजारातील बदल, व्याजदरांची दिशा आणि देशांतर्गत मागणी यांचा मोठा प्रभाव राहू शकतो. ऑगस्टच्या पहिल्या दिशी देशांतर्गत सोन्याच्या किमती वाढल्या की कमी जाल्या, प्रमुख शहरातील भाव किती ते जाणून घेऊया.

देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ नोंदवण्यात आली आहे. १ ऑगस्टच्या सकाळी देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर वाढले असून राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम 1,44,760 रुपये इतका पोहोचला आहे. सोन्याच्या मागणीत झालेली वाढ, विशेषतः किरकोळ ग्राहक आणि दागिने विक्रेत्यांकडून वाढलेली खरेदी, ही दरवाढीमागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.दिल्लीच्या सराफा बाजारात एक दिवस आधी ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम 1,48,300 रुपये वर पोहोचला. सणासुदीच्या काळापूर्वी वाढणारी मागणी आणि बाजारातील खरेदीचा कल यामुळे देशांतर्गत सोन्याच्या किमतींवर परिणाम होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोन्याच्या दरात घसरण
देशांतर्गत बाजारातील वाढीच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये घसरण दिसून आली आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, स्पॉट गोल्डची किंमत कमी होऊन 4,049.83 डॉलर प्रति औंस झाली आहे. याशिवाय ऑगस्ट महिन्यात डिलिव्हरीसाठी असलेल्या US Gold Futures मध्येही घसरण झाली असून त्याचा भाव 4,107 डॉलर प्रति औंस इतका राहिला आहे. जागतिक बाजारातील हालचाली, डॉलरची स्थिती आणि गुंतवणूकदारांचा बदलता कल याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर होत आहे.
देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर
दिल्ली:
२४ कॅरेट सोने: 1,44,760 रुपये प्रति 10 ग्रॅम
२२ कॅरेट सोने: 1,32,710 रुपये प्रति 10 ग्रॅम
मुंबई आणि कोलकाता:
२४ कॅरेट सोने: 1,44,610 रुपये प्रति 10 ग्रॅम
२२ कॅरेट सोने: 1,32,560 रुपये प्रति 10 ग्रॅम
चेन्नई:
२४ कॅरेट सोने: 1,44,610 रुपये प्रति 10 ग्रॅम
२२ कॅरेट सोने: 1,32,560 रुपये प्रति 10 ग्रॅम
पुणे आणि बंगळुरू:
२४ कॅरेट सोने: 1,44,610 रुपये प्रति 10 ग्रॅम
२२ कॅरेट सोने: 1,32,560 रुपये प्रति 10 ग्रॅम
| शहर | 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) | 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) |
| दिल्ली | 132710 | 144760 |
| मुंबई | 132560 | 144610 |
| अहमदाबाद | 132610 | 144660 |
| चेन्नई | 132560 | 144610 |
| कोलकाता | 132560 | 144610 |
| हैदराबाद | 132560 | 144610 |
| जयपुर | 132710 | 144760 |
| भोपाळ | 132610 | 144660 |
| लखनऊ | 132710 | 144760 |
| चंदीगड | 132710 | 144760 |
इंदूर सराफा बाजारात सोन्या-चांदीला चांगली मागणी
३१ जुलै रोजी इंदूरच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या खरेदीत तेजी पाहायला मिळाली. बाजारात सोन्याचा सरासरी भाव 1,41,500 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा सरासरी भाव 2,20,000 रुपये प्रति किलो नोंदवण्यात आला.
चांदीच्या दरात घसरण कायम
दरम्यान, देशांतर्गत बाजारात चांदीच्या किमतींमध्ये घसरण सुरूच आहे. 1ऑगस्टच्या सकाळी चांदीचा भाव 2,34,900 रुपये प्रति किलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीच्या दरात कमजोरी दिसून आली असून रॉयटर्सच्या माहितीनुसार स्पॉट सिल्व्हरची किंमत घसरून 57.76 डॉलर प्रति औंस झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील काळात सोन्याच्या किमतींवर जागतिक बाजारातील घडामोडी, चलन बाजारातील बदल, व्याजदरांची दिशा आणि देशांतर्गत मागणी यांचा मोठा प्रभाव राहू शकतो.
