AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर

| Updated on: Aug 01, 2026 | 9:21 AM
Share

Maharashtra News LIVE : नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असं आवहान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केलं आहे. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन, राजकारणातील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

Maharashtra News LIVE : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर

LIVE NEWS & UPDATES

  • 01 Aug 2026 09:21 AM (IST)

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अहिल्यानगर येथे नगरसेवकांसोबत बैठक

    अहिल्यानगर : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नगरसेवकांसोबत बैठक झाली.  आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी भेट झाली.  महानगरपालिकेच्या विकासासाठी 600 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली तसेच रखडलेल्या विकासकामांचे निवेदन नगरसेवकांनी सुनेत्रा पवार यांना दिले.  निधीअभावी शहरातील अनेक विकासकामे मंदावल्याचे नगरसेवकांचे म्हणणं आहे.  शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली.

  • 01 Aug 2026 09:13 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर मनपाच्या 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

    छत्रपती संभाजीनगर मनपाच्या 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे.  भाजपच्या 7 तर एमआयएमच्या 16 नगरसेवकांचा समावेश आहे.  पराभूत उमेदवारांच्या तक्रारीनंतर मनपा प्रशासनाने कारवाई करत  बेकायदा बांधकाम, अतिक्रमण आणि इतर कारणांवरून नोटिसा पाठवल्या.   नगरसेवकांना बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार असून ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुनावणी होणार आहे.

  • 01 Aug 2026 08:56 AM (IST)

    कल्याण पाठोपाठ डोंबिवलीतही रस्त्यांची चाळण; नागरिकांचा संताप

    कल्याण पाठोपाठ डोंबिवलीतही रस्त्यांची चाळण झाली आहे.  डोंबिवली स्टेशन ते गणेशनगर , गरीबांचा वाडा मार्गावरील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांनी नागरिक, वाहनचालक हैराण झालेत.  रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.  करोडो रुपयांचा ठेका देऊन अर्धा पावसाळा उलटला तरी डागडुजी नाही ; केडीएमसीच्या कामकाजावर नागरिक संतापले आहेत.

  • 01 Aug 2026 08:54 AM (IST)

    मुंबई आग्रा महामार्गावर गेल्या 12 तासापासू मोठा ट्रॅफिक जॅम

    मुंबई आग्रा महामार्गावर गेल्या 12 तासापासून मोठा ट्रॅफिक जॅम झाला असून जाम मध्ये अडकलेले वाहन चालक त्रस्त झालेत.  संपूर्ण रात्र महामार्गावर काढावी लागल्याने अनेक कुटुंबांचे हाल होत आहेत.  महामार्ग वाहतूक शाखेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. रोहित टिळक यांच्या लोकमान्य टिळक ट्रस्ट कडून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान भाजप नेते विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली असून विजय चौधरी यांचा स्वीय सहाय्यक यश टिपरे पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं. नंदुरबार जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना आज सुट्टी देण्यात आली आहे. तर बंद घराची रेकी करून घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन, राजकारण या सर्व क्षेत्रांतील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

Published On - Aug 01,2026 8:53 AM

Follow Us
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...