
टीम इंडियाचा फलंदाज अभिषेक शर्मा याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या 2 टी 20i सामन्यात काही खास करता आलं नाही. मात्र अभिषेकने तिसर्या सामन्यात भरपाई केली.

अभिषेकने तिसऱ्या सामन्यात विस्फोटक अर्धशतक ठोकलं. अभिषेकने 24 बॉलमध्ये सेंच्युरियन येथे 5 सिक्स आणि 3 फोरसह 50 धावा केल्या.

अभिषेकने या खेळीस अनेक रेकॉर्ड्स उद्धवस्त केले. अभिषेकने एका वर्षात सर्वाधिक टी 20 षटकार खेचत अनेक फलंदाजांना मागे टाकलं.

अभिषेकने आतापर्यंत 2024 या वर्षात एकूण 65 सिक्स (आंतरराष्ट्रीय-आयपीएल-टी 20 क्रिकेट) लगावले आहेत. अभिषेकने यासह रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यरसह अनेक फलंदाजांना मागे टाकलं.

तसेच अभिषेकने टी 20i क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम केला आहे. अभिषेक पावरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संयुक्तरित्या दुसरा फलंदाज ठरला आहे.

अभिषेकने तिसऱ्या टी 20i सामन्यात एकूण 5 सिक्स लगावले. अभिषेकने त्यापैकी 4 सिक्स हे पावरप्लेमध्ये ठोकले. तसेच अभिषेकने तिलक वर्मा याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारीही केली.