INDW vs SAW Final : 200 पेक्षा अधिक धावा आणि 12 विकेट्स, भारताला फायनलमध्ये या खेळाडूकडून सर्वाधिक धोका

South Africa vs India Womens World Cup Final 2025 : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ स्पर्धेच्या इतिहासात एकूण 6 वेळा आमनेसामने आले आहेत. दोघांनी प्रत्येकी 3-3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात चढाओढ पाहायला मिळणार आहे. तसेच भारतासमोर या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या अनुभवी ऑलराउंडरचं आव्हान आहे.

| Updated on: Nov 02, 2025 | 6:31 PM
1 / 5
आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. मायदेशात स्पर्धा होत असल्याने भारताला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी अधिक आहे. मात्र मैदानातील खेळावर कोण जिंकणार हे निश्चित होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील गेल्या 3 सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे.  त्यामुळे टीम इंडियासाठी हा महाअंतिम सामना आव्हानात्मक असणार आहे. या सामन्यात भारतासमोर दक्षिण आफ्रिकेच्या एका अनुभवी ऑलराउंडरला रोखण्याचं आव्हान आहे. (Photo Credit: PTI)

2 / 5
मारिजान काप या अनुभवी ऑलराउंडरने या स्पर्धेत आतापर्यंत बॅटिंग आणि बॉलिंगने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कापने सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध 42 धावा केल्या. तसेच 5 विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं होतं.  (Photo Credit: PTI)

3 / 5
कापने सेमी फायनलमधील अवघ्या 20 धावांच्या मोबदल्यात या 5 विकेट्स मिळवल्या होत्या. काप यासह वर्ल्ड कप सेमी फायनलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारी दुसरी यशस्वी गोलंदाज ठरली. तसेच काप वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 44 विकेट्स घेणारी पहिली गोलंदाज ठरली. कापने टीम इंडियाची माजी गोलंदाज झुलन गोस्वामी हीच्या 43 विकेट्सचा रेकॉर्ड मोडीत काढला.  (Photo Credit: PTI)

4 / 5
कापने साखळी फेरीत टीम इंडिया विरुद्ध निर्णायक कामगिरी केली होती. कापने त्या सामन्यात 20 धावा केल्या होत्या. तसेच 2 विकेट्सही मिळवल्या होत्या. कापने टीम इंडिया विरुद्ध 24 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 शतकासह 545 धावा केल्या आहेत. तसेच कापने टीम इंडिया विरुद्ध 24 विकेट्सही मिळवल्या आहेत. (Photo Credit: PTI)

5 / 5
दक्षिण आफ्रिकेची ही अनुभवी ऑलराउंडर सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. कापने या स्पर्धेतील 7 सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांसह 204 धावा केल्या आहेत. तसेच कापने 8 डावांत 12 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit: PTI)