
टीम इंडियाचा दिग्गज माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर सध्या ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये धमाल मस्ती करत आहेत. सारासोबत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज मॅथ्यू हेडन याची मुलगी ग्रेस हेडन ही देखील आहे. दोघीही एकत्र फिरत आहेत. सारा आणि ग्रेस दोघीही चांगल्या मैत्रीणी आहेत. साराने इंस्टाग्रामवर काही खास फोटो पोस्ट केले आहेत. (Photo-Screenshot/Instagram)

साराने या दरम्यान तिच्या मनाजवळ नक्की कोण आहे, हे सांगितलं. "क्वीसलँड माझं मन जिंकून घेतं", असं कॅप्शन साराने दिलं आहे. क्वीसलँड माझ्या मनाजवळ असल्याचं साराने म्हटलं. साराचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Photo-Screenshot/Instagram)

सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात समुद्रकिनारी मजामस्ती केली. साराने ब्रिस्बेनेमध्ये सॉफ्ट ड्रिंक घेतलं. साराने हे फोटोही इंस्टाग्रामवर चाहत्यांसह शेअर केले. (Photo-Screenshot/Instagram)

सारा फोटोत ब्रिस्बेनमधील एका फिश लेनवर पाहायला मिळत आहे. सारा या फोटोत फार आनंदी दिसत आहे. साराने ग्रेस हेडनसह अनेक ठिकाणी फिरण्याचा आनंद घेतला. (Photo-Screenshot/Instagram)

सारा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सारा अनेक सामन्यांसाठी स्टेडियममध्ये उपस्थित असते. सारा क्रिकेट टीमला प्रोत्साहित करण्यासाठी चिअरअप करते. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सारा तिथे गेली होती. (Photo-Screenshot/Instagram)

"ब्रिस्बेनच्या रस्त्यांपासून ते गोल्ड कोस्टच्या सोनेरी समुद्र किनाऱ्यांपर्यंत, क्वीन्सलँडने माझे मन जिंकलं आणि आरामशीर प्रवासासाठी @SingaporeAir चे आभार.", असं साराने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय. (Photo Screenshot/Instagram)