
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनर स्टेडियमवर होणार आहे. सहा वर्षानंतर या मैदानात सामना होणार आहे. ईडन गार्डनवर 2019 मध्ये शेवटचा भारत बांग्लादेश कसोटी सामना खेळला गेला होता. (Photo: PTI)

ईडन गार्डनवर होणाऱ्या कसोटी मालिकेतून ऋषभ पंतचं कमबॅक होणार आहे. तसेच शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल यांच्या कामगिरीवर लक्ष असेल. इतकंच अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्यासाठी हा कसोटी सामना फार महत्त्वाचा असणार आहे. कारण एक दुर्मिळ विक्रम नावावर करण्याची संधी आहे. (Photo: Quinn Rooney/Getty Images)

ईडन गार्डनवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 13 कसोटी सामन्यातील 12 डावात 5 विकेट घेतल्या आहे. तर तर रवींद्र जडेजाने 3 कसोटी सामन्यातील 6 डावात चार विकेट घेतल्या आहेत. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन विकेट घेताच सचिनचा नावावर असलेल्या विक्रम आपल्या नावावर करेल. (Photo: PTI)

सचिन तेंडुलकरने कोलकात्यात 31 धावा देत 3 गडी बाद केल्याचा विक्रम केला आहे. तर याच मैदानात 41 धावा देत 3 घेतल्याची कामगिरी रवींद्र जडेजाने केली आहे. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असेल. (Photo: PTI)

रवींद्र जडेजाने 87 कसोटी सामन्यात 169 डावात 338 विकेट घेतल्या आहेत. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 350 विकेट पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी दोन कसोटी सामन्यातील 4 डावात 12 विकेट काढाव्या लागतील. जर तसं झालं तर अनिल कुंबळे, आर अश्विन, कपिल देव, हरभजन सिंग यांच्यानंतर हा टप्पा गाठणारा पाचवा गोलंदाज ठरेल. (Photo-PTI)