IND vs NZ Final : अंतिम फेरीत 1 धाव घेताच संजू सॅमसन रचणार इतिहास, धोनीनंतर दुसरा भारतीय ठरणार
T20 World Cup 2026 Final: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा विजेता काही तासात कळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. या सामन्यात विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना भारत न्यूझीलंड यांच्यात होत आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात संजू सॅमसन एका विक्रमाच्या वेशीवर उभा आहे. एका खास पंगतीत त्याला स्थान मिळणार आहे. (PHOTO CREDIT- PTI)

संजू सॅमसनने फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. सुपर 8 फेरीतील करो या मरो सामन्यात आणि उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध त्याने चांगली कामगिरी केली. भारतासाठी मॅच विनर असल्याचं सिद्ध होत आहे. आता त्याच्याकडे महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. त्यासाठी फक्त 1 धाव आवश्यक आहे. (PHOTO CREDIT- PTI)

संजू सॅमसनने अंतिम सामन्यात 1 धाव घेताच टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा भारताचा दुसरा विकेटकीपर ठरेल. यापूर्वी हा कारनामा फक्त महेंद्रसिंह धोनीने केला आहे. त्याने विकेटकीपर फलंदाज म्हणून 1617 टी20 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

संजू सॅमसनने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 1310 धावा केल्या आहेत. पण विकेटकीपर फलंदाज म्हणून 999 धावा नावावर आहेत. यात 5 अर्धशतकं आणि 3 शतकांचा समावेश आहे. (PHOTO CREDIT- PTI)

संजू सॅमसनने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत फक्त 4 सामने खेळले आहेत. यात त्याने 77.33 च्या सरासरीने 232 धावा केल्या आहेत. मागच्या दोन सामन्यात प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. यावेळी संजूचा स्ट्राईक रेट हा 201.73चा होता. (PHOTO CREDIT- PTI)