
विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या सरफराज खानने पंजाबविरुद्ध स्फोटक अर्धशतक झळकावले. जयपूरमध्ये झालेल्या या सामन्यात पंजाबने दिलेल्या 216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 15 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुर्दैवाने या सामन्यात मुंबईचा एका धावेने पराभव झाला. (फोटो- BCCI Domestic Twitter)

सरफराज खानने फक्त 20 चेंडूंचा सामना करत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 62 धावा केल्या. सरफराजच्या अर्धशतकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने पंजाबचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने टाकलेल्या एका षटकात एकूण 30 धावा काढल्या. (Photo- PTI)

सरफराजने अभिषेकच्या षटकात 3 षटकार आणि 3 मारले. त्याने पहिल्या चेंडूवर एक षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार, पाचव्या चेंडूवरही षटकार आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारला. (फोटो- Sarfaraz Khan Instagram)

सरफराज खानने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रम रचला आहे. सरफराज खानने अतित सेठचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने 2020-21 मध्ये बडोद्याकडून खेळताना छत्तीसगडविरुद्ध 16 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. (फोटो- Sarfaraz Khan Instagram)

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सरफराज हा मुंबईचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने सहा डावांमध्ये 303 धावा केल्या आहेत. यापूर्वी त्याने गोव्याविरुद्ध 157 आणि उत्तराखंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. (फोटो- Sarfaraz Khan Instagram)