
देशांतर्गत बुची बाबू स्पर्धेत सरफराज खानने सलग दोन शतकं ठोकून आपला दावा भारतीय संघासाठी ठोकला आहे.दुलीप ट्रॉफीत चमकदार कामगिरी करून त्याची निवड करणं भाग पडलं असतं. त्याने फिटनेवरही काम केलं होतं आणि दहा किलोपेक्षा जास्त वजन कमी केलं होतं. पण त्याच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. (फोटो- पीटीआय)

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट झोनकडून खेळणारा सरफराज खान दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे 4 सप्टेंबरपासून सेंट्रल झोनविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना सरफराज खान खेळणार नसल्याचं वृत्त आहे. (फोटो- पीटीआय)

सूत्रांच्या माहितीनुसार, 'सरफराजला क्वााड्रिसेप्स दुखापत झाली आहे. पाच दिवसांपूर्वी हरयाणाविरुद्ध शतक करताना ही दुखापत झाली होती. त्यामुळे किमान 3 आठवडे खेळणार नाही. त्याच्यावर सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये देखरेख केली जात आहे.' (फोटो- पीटीआय)

ऑक्टोबर महिन्यात भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या संघात स्थान मिळवण्यासाठी प्रमुख दावेदारांपैकी एक होता. 27 वर्षीय सरफराज खान 6 कसोटी सामने खेळला आहे. त्याने एक शतक, 3 अर्धशतकांसह 371 धावा केल्या आहेत. (फोटो- पीटीआय)

सरफराज खान दुखापतग्रस्त झाल्याने दुलीप ट्रॉफीत त्याची जागा अनुभवी फलंदाज शिवालिक शर्मा घेऊ शकतो. त्याने 18 फर्स्ट क्लास सामन्यात 43.48 च्या सरासरीने 1087 धावा केल्या आहेत. देशांतर्गत सामन्यात 44 च्या सरासरीने 484 धावा केल्या आहेत. (फोटो क्रेडिट-Screenshot/Instagram)