
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात हार्षित राणाच्या गोलंदाजीवर एलेक्स कॅरीचा झेल पकडताना श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली. झेल पकडला मात्र उडी मारताना दुखापतग्रस्त झाला. दरम्यान, अय्यरच्या पालकांनी आपत्कालीन व्हिसासाठी अर्ज केला आहे. ते लवकरच सिडनीला रवाना होणार असल्याचे वृत्त आहे. (Photo- Twitter/ShreyasIyer15)

श्रेयस अय्यरच्या डाव्या बरगडीला गंभीर दुखापत झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. त्यामुळे वेदनांनी त्रस्त असलेल्या श्रेयस अय्यरला ताबडतोब रुग्णालायत दाखल करण्यात आले. तपासणीनंतर पोटाच्या वरच्या भागात (प्लीहा) अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचं निष्पन्न झालं आहे. (Photo- Getty Images)

दोन दिवस त्याच्या उपचार केल्यानंतर त्याची रवानगी आयसीयूत करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांसह पालकांची चिंताही वाढली आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक सिडनी आणि भारतातील वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत करून श्रेयसच्या दुखापतीच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. (Photo- Getty Images)

श्रेयस अय्यरच्या पालकांनी आयसीयूत दाखल असलेल्या श्रेयस अय्यरला भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियन व्हिसासाठी अर्ज केल्याचे वृत्त आहे. लवकरच ते सिडनीला रवाना होणार आहेत. दरम्यान, चाहत्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. (Photo: Ayush Kumar/Getty Images)

भारतीय संघाचे डॉक्टर त्याच्या दैनंदिन प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी सिडनीमध्येच राहतील, असे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले. श्रेयस अय्यरला आणखी पाच सहा दिवस ऑस्ट्रेलियातील सिडनीत उपचार घ्यावे लागणार आहेत. (Photo- Twitter/ShreyasIyer15)