शुबमन गिल अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात रचणार इतिहास, इतक्या धावा केल्या की झालं

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 13 जूनपासून वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात कर्णधार शुबमन गिलला विक्रम रचण्याची संधी आहे. चला जाणून घेऊयात काय ते..

| Updated on: Jun 12, 2026 | 6:54 PM
1 / 5
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 13 जून रोजी होणार धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात कर्णधार शुबमन गिलकडे एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. (Photo: BCCI)

2 / 5
शुबमन गिल शिखर धवनचा 10 वर्षे जुना विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. वनडे सामन्यात झटपट 3000 धावा करण्याचा विक्रम मोडण्याची संधी शुबमन गिलकडे आहे. यासह जगातील दुसरा वेगवान फलंदाज होण्याचा मान मिळेल. (Photo: BCCI)

3 / 5
भारतीय कर्णधार शुभमन गिलने 61 एकदिवसीय सामन्यांच्या 61 डावांमध्ये 8 शतके आणि 17 अर्धशतकांसह 2953 धावा केल्या आहेत. 3000 धावा पूर्ण करण्यासाठी त्याला अजून 47 धावांची गरज आहे. पहिल्या वनडे सामन्यात हा विक्रम रचण्याची शक्यता आहे. (Photo: BCCI)

4 / 5
शिखर धवनने वनडे क्रिकेटमध्ये 72 डावात 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. आता गिलकडे हा विक्रम मोडण्याची संधी आहे. गिलने 47 धावा करताच शिखर धवनला मागे टाकेल. वनडे क्रिकेटमध्ये वेगाने 3000 धावा करणारा भारतीय फलंदाज ठरेल. (Photo: BCCI)

5 / 5
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम अमला याने 57 डावात 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. तर वेस्ट इंडिजच्या शाई होपने 67 डावात ही कामगिरी केली आहे. आता शुबमन गिल 62 डावात 3000 धावा पूर्ण करून दुसऱ्या स्थानी पोहोचू शकतो. (Photo: BCCI)

Follow Us