इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे.या मालिकेत अनेक खेळाडूंकडून क्रिकेट चाहत्यांना शानदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.त्यामध्ये शुबमन गिल याचं नाव आघाडीवर आहे. शुबमन इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरु शकतो. (Photo Credit : Shubman Gill X Account)

करुण नायर याचं अनेक वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. तसेच करुणने नुकतंच इंग्लंड लायन्स विरुद्ध द्विशतक झळकावलं. त्यामुळे करुणला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. (Photo Credit : Icc X Account)

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा प्रमुख अस्त्र आहे. बुमराह इंग्लंड दौऱ्यावर गेमचेंजर ठरु शकतो. मात्र बुमराह सर्वच्या सर्व 5 सामने खेळणार नसल्याचं स्पष्ट आहे. (Photo Credit : Jasprit Bumrah X Account)

त्यामुळे बुमराह 5 पैकी कोणते 3 सामने खेळणार? याबाबतचा निर्णय टीम इंडियाची मालिकेतील स्थिती पाहून घेतला जाईल, असं हेड कोच गौतम गंभीर याने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं. (Photo Credit : Shubman Gill X Account)