
टीम इंडियाच्या कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलने बर्मिंघममध्ये द्विशतक ठोकत इतिहास रचला आहे. द्विशतक ठोकणारा भारताचा सहावा कर्णधार आहे. गिलचं कसोटी क्रिकेटमधील हे पहिलं द्विशतक आहे. त्याच्या या खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 587 धावांपर्यंत मजल मारली. यापूर्वी लीड्स कसोटीतही शतक ठोकलं होतं. (Photo-PTI)

शुबमन गिल धावांच्या बाबतीच नाही तर कमाईतही खूप पुढे आहे. शुबमन गिलने 25व्या वर्षीच जबरदस्त कमाई केली आहे. त्याची सध्याची नेटवर्थ ही जवळपास 34 कोटींच्या घरात आहे. गिलने ही कमाई क्रिकेट व्यतिरिक्त इंडियन प्रीमियल लीग करार आणि जाहिरातीतून केली आहे. (Photo-PTI)

भारतीय कसोटी कर्णधार महिन्याला जवळपास 50 लाखाहून अधिक कमावतो. या शिवाय वर्षाला 4 ते 7 कोटी रुपयांची कमाई करतो. शुबमन गिल बीसीसीआयच्या ग्रे ए करारात सहभागी आहे. त्याला वर्षाला 7 कोटी रुपये पगार मिळतो. सामना खेळण्यासाठी त्याला वेगळे पैसे मिळतात. (Photo-PTI)

शुबमन गिल आयपीएलमध्ये प्रति सिझन 16.5 कोटी रुपये कमावतो. इतकंच नाही तर ब्रँडच्या जाहिरातीतही दिसतो. यातून त्याला चांगली रक्कम मिळत असणार यात काही शंका नाही. जाहिरातीतून त्याला वर्षाकाठी 2 ते 3 कोटींची कमाई होत असावी. (Photo-PTI)

शुबमन गिलचं पंजाबच्या फिरोजपूरमध्ये मोठं घर आहे. या घराची किंमत 3.2 कोटीच्या आसपास आहे. गिलकडे महागड्या गाड्या आहेत. यात रेंज रोव्हर वेलार, मर्सिडीज बेंज ई350 आणि महिंद्रा थार आहे. महिंद्रा थार त्याला आनंद महिंद्रा यांनी दिली होती. (Photo-Screenshot/Instagram)