
टीम इंडियाचा ओपनर शुबमन गिल याने पाकिस्तान विरुद्ध खणखणीत अर्धशतक ठोकलं. शुबमनने 52 बॉलमध्ये 58 धावांची खेळी केली. शुबमनने या खेळीसह एक मोठा रेकॉर्ड केला आहे. शुबमनने पहिल्या 30 वनडे इनिंगमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक धावांचा विक्रम केला आहे.

शुबममने पहिल्या 30 वनडे सामन्यांमध्ये 1 हजार 572 धावा केल्या आहेत. शुबमन याबाबतीत टीम इंडियाकडून नंबर 1 बॅट्समन ठरलाय. शुबमनने याबाबतीत विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांना पछाडलंय. धोनी याबाबतीत 7 आणि विराट सहाव्या नंबरवर आहे. तर श्रेयस अय्यर दुसऱ्या स्थानी आहे.

शुबमनने 30 डावांमध्ये 1 द्विशतक, 4 शतक आणि 8 अर्धशतकांसह 1 हजार 572 धावा केल्या आहेत. शुबमनचा वनडे क्रिकेटमध्ये 208 धावा ही सर्वोत्तम खेळी आहे.

टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध टॉस गमावला. पाकिस्तानने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. शुबमनने या दरम्यान 58 धावांची खेळी केली. तर रोहितने 49 बॉलमध्ये 56 रन्स केल्या. रोहितने या दरम्यान 6 चौकार आणि 4 सिक्स ठोकले.

टीम इंडियाने 24.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 147 धावा केल्या आहेत. मात्र यानंतर पावसामुळे खेळ थांबला. विराट कोहली 8 आणि केएल राहुल 17 धावांवर नाबाद आहेत.