6,6,6,6,6,6,6..! सरफराज खानचं अवघ्या 47 चेंडूत शतक, 200 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने केली धुलाई

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत मुंबईच्या सरफराज खानचा झंझावात पाहायला मिळाला. आसामविरुद्धच्या सामन्यात सरफराज खानची बॅट चांगली तळपली. यावेळी त्याने क्रिकेट कारकि‍र्दीत पहिल्यांच विक्रमाची नोंद केली.

Updated on: Dec 02, 2025 | 4:32 PM
1 / 5
सरफराज खान गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याला हवी तशी संधी मिळत नाही. असं असताना सरफराज खानने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचा झंझावात दाखवून दिला.  (Photo- PTI)

2 / 5
सरफराज खानने त्याच्या टी20 कारकिर्दीतील पहिलं शतकं ठोकलं. मुंबईकडून खेळताना आसामविरुद्धच्या सामन्यात 47 चेंडूत नाबाद 100 धावांची धमाकेदार खेळी केली. यावेळी त्याने 8 चौकार आणि 7 षटकार मारले.  (Photo- PTI)

3 / 5
सरफराज खानने 47 चेंडूत शतक ठोकून दाखवून दिले आहे की फक्त रेड-बॉल क्रिकेटमध्येच नाही तर व्हाईट-बॉल क्रिकेटमध्येही झंझावाती खेळी करू शकतो. त्याच्या या खेळीमुळे मुंबईने आसामला विजयासाठी 220 धावांचं आव्हान दिलं.  (Photo- PTI)

4 / 5
सरफराज खानने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी पुन्हा एकदा टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे. खरं तर त्याला संघात स्थान मिळणं खूपच कठीण आहे. पण सरफराज खानने शतकी खेळी करून पुन्हा एकदा दावा ठोकला आहे.  (Photo- PTI)

5 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेचा मिनी लिलाव 16 डिसेंबरला होणार आहे. अशा स्थितीत सरफराज खानची शतकी खेळी फ्रेंचायझींचं लक्ष वेधून घेईल. आयपीएल 2023 नंतर दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिलीज केलं पण त्यानंतर त्याला कोणी खरेदीदार मिळाला नाही.  पण आता फ्रेंचायझी मधल्या फळीतील एका चांगल्या भारतीय फलंदाजाच्या शोधात आहेत.  (Photo- PTI)