
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला. दक्षिण अफ्रिकेने प्रथम गोलंदाजी घेत भारताला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. भारताने या सामन्यात सावध सुरुवात केली. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. (Photo- BCCI Women Twitter)

स्मृती मंधानाने या सामनयात 58 चेंडूत खेळत 8 चौकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. क्लो ट्रायनच्या गोलंदाजीवर सिनालो जाफ्ताने तिचा झेल पकडला आणि तंबूत परतावं लागलं. पण या खेळीसह स्मृती मंधानाने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. (Photo- BCCI Women Twitter)

स्मृती मंधाना एका विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. स्मृती मंधानाने या स्पर्धेत सर्वाधिका धावा करणारी दुसरी फलंदाज ठरली आहे. स्मृतीने या स्पर्धेतील नऊ सामन्यात 54.25 च्या सरासरीने 434 धावा केल्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo- BCCI Women Twitter)

स्मृती मंधानाने या धावांसह मिताली राजचा विक्रम मोडीत काढला आहे. मितालीने 2017 च्या वर्ल्डकप स्पर्धेत 409 धावा काढल्या होत्या. मात्र आता स्मृती मंधाना तिच्या पुढे निघून गेली आहे. तिच्या पेक्षा जास्त धावा करून भारताकडून वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. (Photo- BCCI Women Twitter)

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा मान दक्षिण अफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डच्या नावावर आहे. तिने 470 धावा केल्या आहेत. यात आणखी भर पडू शकते. स्मृतीने या स्पर्धेत एकूण 434 धावा केल्या आहेत. (Photo- BCCI Women Twitter)