
आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील टीम इंडियाच्या पहिल्या 3 सामन्यांमध्ये बॅटिंगने निराशा करणाऱ्या स्मृती मंधाना हीने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात इतिहास घडवला आहे. स्मृतीने 80 धावांच्या खेळीसह वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. स्मृतीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 121.21 च्या स्ट्राईक रेटने 66 बॉलमध्ये 80 रन्स केल्या. स्मृतीने या खेळीत 3 सिक्स आणि 9 फोर लगावले. (Photo Credit : Bcci Womens X Account)

स्मृतीने या खेळीत 18 धावाच करताच इतिहास घडवला. स्मृतीने 8 व्या ओव्हरमध्ये 2 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 18 धावा पूर्ण केल्या. स्मृती यासह एका वर्षात 1 हजार धावा पूर्ण करणारी पहिली महिला फलंदाज ठरली. स्मृतीने अवघ्या 18 डावांत ही कामगिरी केली. (Photo Credit : Bcci Womens X Account)

स्मृतीने अवघ्या 46 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. स्मृतीचं हे एकदिवसीय कारकीर्दीतील 33 वं अर्धशतक ठरलं. विशेष म्हणजे स्मृतीचं ऑस्ट्रेलिया विरुद्धचं सलग पाचवं अर्धशतक ठरलं. (Photo Credit : Bcci Womens X Account)

स्मृतीने 58 धावा पूर्ण करतात वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. स्मृती एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात युवा आणि वेगवान 5 हजार धावा करणारी पहिली फलंदाज ठरली. स्मृतीने वयाच्या 29 व्या वर्षी हा कारनामा केला. (Photo Credit : Bcci Womens X Account)

स्मृतीने 5 हजार 569 चेंडूत आणि 112 डावात 5 हजार धावा केल्या. स्मृतीने यासह विंडीजच्या स्टेफनी टेलर (129 डाव) आणि न्यूझीलंडच्या सूझी बेट्स (6182 बॉल) यांचा रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit : Bcci)