
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यावर भारताने मजबूत पकड मिळवली आहे. दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात न्यूझीलंडने 9 गडी गमवून 171 धावा केल्या. न्यूझीलंडकडे 143 धावांची आघाडी आहे.

आर अश्विनला न्यूझीलंडविरुद्धची कसोटी काही खास गेली नाही. पण मुंबई कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आर अश्विनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. फिरकीपटू अनिल कुंबळेचा विक्रम मोडीत काढला आहे.

आर अश्विनने दुसऱ्या डावात रचिन रवींद्रची विकेट घेतली.या विकेटनंतर भारताकडून वानखेडेवर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये 42 विकेट घेतल्या.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आर अश्विनने 42 विकेट, अनिल कुंबळेने 38, कपिल देवने 28, हरभजन सिंगने 24 आणि कर्सन घारवीने 23 विकेट घेतल्या आहेत.

आर अश्विनने वानखेडे स्टेडियमनंतर चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सर्वाधिक 42 विकेट घेतल्या आहेत. (सर्व फोटो - बीसीसीआय)