Abhishek Sharma : याचं काय चाललंय? 14 सामन्यांत 6 वेळा Duck, अभिषेकची वर्ल्ड कपनंतर आयपीएलमध्ये हारकीरी

Abhishek Sharma Duck : टी 20 क्रिकेटमध्ये 2026 पासून ते आतापर्यंत आकडेवारी पाहता अभिषेक शर्मा अपयशी ठरलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अभिषेकची 75 दिवसांत झिरोवर आऊट होण्याची सहावी वेळ ठरलीय.

| Updated on: Apr 05, 2026 | 8:29 PM
1 / 5
टीम इंडियाचा युवा ओपनर अभिषेक शर्मा नुकत्याच झालेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सलग 3 वेळा झिरोवर आऊट झाला. अभिषेकने फायनलमध्ये अर्धशतक करुन डॅमेज कंट्रोल केलं. मात्र अभिषेकने झिरोवर आऊट होण्याची परंपरा आयपीएल स्पर्धेतही कायम ठेवली आहे. (Photo Credit: PTI)

2 / 5
अभिषेकने आयपीएल स्पर्धेतील 17 आणि 18 व्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली. अभिषेकने भारतासाठी  टी 20i क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली. मात्र अभिषेक गेल्या काही महिन्यांत अपवाद वगळता अपयशी ठरत आहे. कहर म्हणजे फक्त अपयशीच नाही तर त्याला भोपळाही फोडता येत नाहीय.   (Photo Credit: PTI)

3 / 5
अभिषेकने वर्ल्ड कप स्पर्धेत सलग 3 वेळा झिरोवर बाद झाल्यानंतर कमबॅक केलं. मात्र सनरायजर्स हैदराबादचा युवा फलंदाज पुन्हा  त्या ट्रॅकवर परतताना दिसतोय. अभिषेक आयपीएल 2026 स्पर्धेत 5 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध झिरोवर आऊट झाला. मोहम्मद शमी याने अभिषेकला आऊट केलं.  (Photo Credit: PTI)

4 / 5
अभिषेकची यासह 2026 वर्षात झिरोवर आऊट होण्याची ही सहावी वेळ ठरली. अभिषेक नववर्षात 21 जानेवारी रोजी पहिल्यांदा झिरोवर आऊट झाला. त्यानंतर अभिषेकची 5 एप्रिलला भोपळा न फोडण्याची एकूण सहावी वेळ ठरली. अभिषेक या 75 दिवसांदरम्यान एकूण 14 टी 20 सामने खेळला. या 14 पैकी 6 सामन्यांत अभिषेक आला तसाच गेला. अभिषेक वर्ल्ड कप स्पर्धेआधी झालेल्या न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20I मालिकेतही 2 वेळा खातं उघडण्यात अपयशी ठरला होता. (Photo Credit: PTI)

5 / 5
दरम्यान अभिषेकला 19 व्या मोसमात काही खास करता आलं नाहीय. अभिषेकने 3 सामन्यांमधील 3 डावांत 18 च्या सरासरीने 55 धावा केल्या आहेत.(Photo Credit: PTI)

Follow Us