
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 212 धावांची खेळी केली. तर दक्षिण अप्रिकेने 43 धावांवर चार गडी गमावले आहेत. (Photo- PTI)

ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ आणि व्यू वेबस्टर यांनी चांगली खेळी केली. या व्यतिरिक्त कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. स्टीव्ह स्मिथने 66 धावांची खेळी केली. यासह त्याने लॉर्ड्स स्टेडियमवर एक रेकॉर्ड नावावर केला आहे. (Photo- PTI)

स्टीव्ह स्मिथने 66 धावा करत वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटून गॅरी सोबर्सला मागे टाकलं आहे. स्टीव्ह स्मिथने 51 धावा करताच सोबर्स आणि वॉरेनच्या नावावर असलेला विक्रम आपल्या नावावर केला. (Photo- PTI)

वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्सने लॉर्ड्सवर 571 धावा केल्या आहेत. तर वॉरेन बर्डसलेने 575 धावांची खेळी केली आहे. या दोघांना मागे टाकत स्टीव्ह स्मिथने लॉर्डर्सवर 593 धावा केल्या आहेत. (Photo- PTI)

स्टीव्ह स्मिथने 112 चेंडूंचा सामना केला आणि 10 चौकारांच्या मदतीने 66 धावा केल्या. एडन मार्करमच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकला आणि थेट मार्को यानसेनच्या हाती झेल देऊन बाद झाला. (Photo- Gareth Copley/Getty Images)