Sunil Narine: सुनील नरीनचं ‘द्विशतक’, आयपीएल स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
Sunil Narine 200 IPL Wickets: आयपीएल 2026 स्पर्धेतील 45व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरीनने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने या सामन्यात दोन विकेट घेत आयपीएल स्पर्धेत मोठा पल्ला गाठला आहे.

आयपीएल 2026 च्या 45 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आले. या सामन्यात केकेआरचा स्टार फिरकी गोलंदाज सुनील नरीनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo: Kolkata Knight Riders Twitter)

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सुनील नरीनने 4 षटकांत 31 धावा देत 2 बळी घेतले. त्याने साहिल अरोरा आणि इशान किशन यांना बाद केले. साहिल अरोराची विकेट त्याच्यासाठी आयपीएल कारकिर्दीतील महत्त्वाची विकेट ठरली. कारण या विकेटमुळे 200 आयपीएल बळी पूर्ण झाले. (Photo: Kolkata Knight Riders Twitter)

सुनील नरीनच्या नावावर आता 197 आयपीएल सामन्यांमध्ये 201 बळी आहेत. आयपीएलमध्ये 200 बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. युझवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांनी यापूर्वीच हा टप्पा गाठला आहे. मात्र, विदेशी खेळाडू म्हणून 200 बळी घेणारा तो पहिला गोलंदाज आहे. (Photo: Kolkata Knight Riders Twitter)

सुनील नरीनने कोलकाता नाईट रायडर्ससाठी 201 बळी घेतले हे विशेष आहे. 2012 पासून केकेआरचा भाग आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका खेळाडूने एकाच संघासाठी 200 बळी घेतले आहेत. त्याने मागच्या 14 वर्षांपासून केकेआरसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. (Photo: Kolkata Knight Riders Twitter)

केकेआरसाठी सुनील नरीनची ही कामगिरी विशेष आहे. संपूर्ण केकेआर फ्रँचायझीसाठी अभिमानाचा क्षण आहे. केकेआरच्या प्लेऑफच्या आशा अजूनही जिवंत आहेत. करो या मरोच्या प्रत्येक सामन्यात केकेआरची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. (Photo: Kolkata Knight Riders Twitter)