
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी टीम इंडियाने आक्रमक सुरुवात केली. या सामन्यात अभिषेक शर्माने आक्रमक सुरुवात केली. तर सूर्यकुमार यादवने या सामन्यात एक ऐतिहासिक कामगिरी केली. (Photo- BCCI Twitter)

सूर्यकुमार यादवने नाणेफेकीचा कौल होताच शतक ठोकलं. हे शतक धावांचं नाही तर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचं आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानंतर 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला. (Photo- BCCI Twitter)

सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमचा विक्रम मोडीत काढला. बाबर आझमने फुल मेंबर नेशनमध्ये वेगाने 100 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम केला होता. आता हा विक्रम सूर्यकुमारच्या नावावर झाला आहे. (Photo- BCCI Twitter)

बाबर आझमने 100 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी 2410 दिवस घेतले होते. तर सूर्यकुमार यादवने हा टप्पा फक्त 174 दिवसात पूर्ण केला. म्हणजेच बाबरपेक्षा 636 दिवस कमी घेतले. (Photo- BCCI Twitter)

सूर्यकुमार यादवला टी20 मालिकेतील पहिल्या टी20 सामन्यात सूर गवसल्याचं दिसत आहे. अर्धशतक ठोकू शकला नाही. पण 22 चेंडूत 4 चौाकार आणि 1 षटकार मारत 32 धावा केल्या. (Photo- BCCI Twitter)