
आयपीएल 2025 स्पर्धेत अंतिम फेरीच्या दुसऱ्या संघासाठी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने आले आहेत. या सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबईने पावसामुळे खेळपट्टी धीमी असल्याचा अंदाज घेत सावध सुरुवात केली. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

या सामन्यात सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा जबरदस्त फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. मुंबईच्या 2 विकेट पडल्यानंतर मैदानात उतरला आणि त्याच्या शैलीत फलंदाजी केली. यावेळी त्याने 15 धावांचा टप्पा ओलांडला आणि एक विक्रम आपल्या नावावर केला. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

2016 मध्ये आरसीबीने अंतिम फेरी गाठली होती. तेव्हा एबी डी विलियर्सने 16 डावा त52.84 च्या सरासरीने 687 धावा केल्या होत्या. आयपीएल इतिहासात नॉन ओपनरने इतक्या धावा करण्याचा विक्रम होता. आता विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर झाला आहे. त्याने हा टप्पा ओलांडला असून पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

सूर्यकुमार यादवने या सामन्यात 26 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारत 44 धावांची खेळी केली. यासह त्याने 717 धावा केल्या आहेत. आयपीएल इतिहासात नॉन ओपनर फलंदाजाने इतक्या धावा करण्याची ही पहिली वेळ आहे. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

सूर्यकुमार यादव ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 16 सान्यात 717 धावांची खेळी केली आहे. आता अंतिम फेरी गाठली तर ऑरेंज कॅप मिळवू शकतो. यासाठी त्याला 42 धावांची आवश्यकता असेल. साई सुदर्शन सध्या 759 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)